शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : गुरूवार, 14 मे 2020 (22:26 IST)

Easy Chutney Recipes: चविष्ट चटण्या, उन्हाळ्यात जेवण्याचा स्वाद वाढवतील

निरोगी राहण्यासाठी या 5 प्रकारच्या चविष्ट चटण्या बनवा आणि त्यांपासून होणाऱ्या फायदा जाणून घ्या 
 
पुदिन्याची चविष्ट चटणी
साहित्य : 1 कप पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे, 3 -4 चमचे दही, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा काळं मीठ, चवीपुरती मीठ.
कृती : सर्वप्रथम पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावी. नंतर सर्व साहित्य आणि पुदिन्याची पानं वाटून घ्यावी. आपल्या आवडीनुसार दह्याच्या जागी या चटणीमध्ये कैरीसुद्धा वापरू शकता. या चटणीला आपल्या सोयीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता.
फायदा : पुदिन्याची चटणी आपल्या अन्नाची चव वाढवेल. त्याचबरोबर उष्णता, पोटाच्या आणि त्वचेसंबंधी तक्रारींसाठी सुद्धा पुदिना चटणी फायदेशीर आहे. आपणास आतड्यांच्या त्रास असो, प्रसूतीची वेळ असो, ताप किंवा जुलाबाचा त्रास होत असल्यास ही चटणी खाणे फायदेशीर ठरेल. याच बरोबर ही आपल्या आरोग्याशी निगडित अजून बरेच फायदे देखील देते. 
 
आमसूल चटणी 
साहित्य : 2 मोठे चमचे आमसूल भुकटी (पावडर), 1 चमचा गूळ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा भाजके जिरे, काळं मीठ चवीप्रमाणे, चिमूट भर हिंग, तेल, मीठ आणि पाणी.
कृती : सर्वप्रथम गुळाला पाण्यामध्ये विरघळून घ्या. यात आमसूल पावडर टाकून मिसळून घ्या. एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं तेल गरम करा. यात जिरे, हिंग, लाल तिखट आणि आमसुलाची केलेली पेस्ट टाका आणि शेवटी मीठ घालून गरम करा. ही पेस्ट घट्ट झाल्यावर गॅस वरून काढून घ्या. आमसुलीची चविष्ट चटणी तयार. आपल्या चवीनुसार आपण यात मीठ किंवा गूळ वाढवू शकता.
फायदा : उन्हाळ्याच्या दिवसात ही चटणी थंड असल्यामुळे चविष्ट लागते. ही चटणी कोणत्याही प्रकाराचे नुकसान करत नाही. ही चटणी खाल्ल्यावर आपल्याला सर्दी किंवा घसा खराब होण्यासारखे त्रास होणार नाही. ही पचनासाठी तसेच पोटाच्या समस्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे.
 
लिंबाची आंबट गोड चटणी 
साहित्य : 4 लिंबू, अर्धा चमचा लाल तिखट, एक लहान चमचा जिरे, अर्धा चिमूट हिंग, दोन चिमूट काळं मीठ, मीठ आणि साखर चवीप्रमाणे.
कृती : सर्वप्रथम लिंबाचे बियाणे काढून लिंबाचे लहान लहान तुकडे करावे. आता लिंबाच्या तुकड्यांना सर्व साहित्य घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. लिंबाची आंबट गोड चटणी तयार आहे. या चटणीला आपण पोळी-भाजी, तसेच चविष्ट पदार्थांबरोबर सुद्धा खाऊ शकता.
फायदा : इच्छा असल्यास आपण लिंबाची ही चटणी नियमाने घेऊ शकता. ह्यामुळे आपल्याला फ्रेश वाटेल. लिंबाची ताजी चटणी खाऊन पोट आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला व्हिटॅमिन सी देखील मिळेल.
 
कैरीची आंबट गोड चटणी
साहित्य : 3 कैऱ्या, 1 कांदा, 50 ग्राम पुदिना, अर्धा लहान चमचा जिरे, गूळ चवीप्रमाणे, अर्धा लहान चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे.
कृती : कांदा आणि कैरीचे बारीक काप करावे. वरील सर्व साहित्य घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि गुळाचे प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता. कैरीची चटणी तयार.
फायदा : कैरीची चटणी नियमाने खाल्ल्याने जेवणात चव तर वाढवतेच त्याचबरोबर या मधील व्हिटॅमिन सी, ए आणि बी देखील मिळते. ह्याचा सेवनाने उन्हाळ्याच्या दुष्प्रभाव पासून वाचता येऊ शकेल. हे पोट आणि पचनाच्या समस्येसाठी फायदेशीर आहे. या शिवाय आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि नव्या पेशी तयार करण्यास सुद्धा मदत होते. 
 
चिंचेची चटणी 
साहित्य : 1 वाटी चिंच, पाणी गरजेप्रमाणे, चिमूट भर हिंग, अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे काळं मीठ, मीठ चवीप्रमाणे, लाल तिखट चवीप्रमाणे.
कृती : चिंचेला कोमट पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवा. ह्या मधील बियाणे काढून घ्या. गूळ आणि सर्व साहित्ये घालून मिक्सर मध्ये वाटून घ्या. हे सर्व मिश्रण उकळून घ्या. याला जिऱ्याची फोडणी द्यावी. चिंचेची चटणी तयार आहे. आपल्याला इच्छा असल्यास पातळ करून पन्हे सुद्धा करू शकता. 
फायदा : उन्हाळ्यात चिंचेची चटणी किंवा पन्हं उष्णतेच्या प्रभावाला कमी करतं. या व्यतिरिक्त पचण्यास हे फायदेशीर आहे. उलटी होणे, मळमळणे आणि जुलाब सारख्या त्रासासाठी फायदेशीर आहे.