1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Father and son attacked with knives over loud music in Mumbai

मुंबईत मोठ्या आवाजात गाणे लावल्यावरून एकाच कुटुंबात जोरदार वाद; चाकूने वार केल्याने वडील आणि मुलाचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळीत मोठ्या आवाजात गाणे लावल्यावरून एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद झाला. या घटनेदरम्यान वडील आणि मुलावर चाकूने हल्ला झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील इतर दोन सदस्य जखमी झाले. ही घटना गुरुवारी पहाटे घडली.  
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील विक्रोळी पश्चिमच्या राहुल नगर परिसरात चाकू हल्ल्यात ४० वर्षीय सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले. विश्वकर्मा कुटुंबातील तीन भाऊ एकाच घरात राहत होते. सकाळी मोठ्या आवाजातील संगीतावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला, ज्याचे रूपांतर लवकरच हिंसक हाणामारीत झाले.  पार्कसाईट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेतले असून, सखोल तपास सुरू आहे. एकाच घरात चार भाऊ राहत होते.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मृत सुनील विश्वकर्मा यांच्यासह चार भाऊ एकाच घरात राहत होते. त्यापैकी दोघे तळमजल्यावर आणि दोघे वरच्या मजल्यावर राहत होते. पहाटे चार वाजता सुनीलने मोठ्या आवाजात गाणे वाजवायला सुरुवात केली, ज्यामुळे इतरांना त्रास होऊ लागला. जेव्हा सुनीलचे भाऊ त्याला थांबवण्यासाठी आले, तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, सुनीलवर त्याच्याच भावांनी लाथा, ठोसे आणि चाकूने हल्ला केला. सुनीलच्या १४ वर्षांच्या मुलावरही प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात सुनीलचा दुसरा मुलगा आणि पत्नीही जखमी झाले. आता पुढील तापस  सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
नागपूरमध्ये सरकारी अधिकाऱ्याच्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार