1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Hit and run in Taloja area of ​​Navi Mumbai

तळोजामध्ये भरधाव इलेक्ट्रिक कारने १० जणांना चिरडले; २ ठार तर ८ जण जखमी

नवी मुंबईतील तळोजा सेक्टर १० मध्ये भरधाव महिंद्रा इलेक्ट्रिक कारने अनेकांना चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहे.
नवी मुंबईतील तळोजा परिसरात हिट अँड रनची घटना घडली. तळोजा सेक्टर १० मध्ये भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच चालक कार सोडून फरार झाला आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार विशेष पथके तैनात केली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे.... आणखी वाचा
पुढील लेख
कौटुंबिक हिंसाचार, नांदेडमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गोळीबार केला