Maharashtra New Governor महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी आज दुपारी ४:३० वाजता पार पडणार
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी आज दुपारी ४:३० वाजता पार पडणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा पद आणि गोपनीयतेची शपथविधी आज, १० मार्च २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता लोकभवन मुंबई येथे पार पडणार आहे. तसेच शपथविधी बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते घेण्यात येईल. हे औपचारिक सोहळे राज्यातील प्रमुख राजकीय नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत होईल.
जिष्णू देव वर्मा हे मूळचे त्रिपुरातील राजघराण्यातील असून, पूर्वी तेलंगणाचे राज्यपाल होते. ते त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्रीही राहिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ५-६ मार्च २०२६ रोजी देशातील अनेक राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्या आणि फेरबदल जाहीर केले होते, त्यानुसार त्यांची महाराष्ट्रासाठी नियुक्ती झाली. यापूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता.
तसेच जिष्णू देव वर्मा हे काल ९ मार्च रोजी पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह मुंबईत दाखल झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. शपथविधीनंतर ते महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारतील.
Edited By- Dhanashri Naik