5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर

Last Updated: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (17:49 IST)
निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी, तमिळनाडूतल्या 234 जागांसाठी, केरळातल्या 140, आसाममधल्या 126 तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या 30 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 824 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. 18.68 कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. 2.7 लाख मतदान केंद्र असणार आहेत” अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.
आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. 27
मार्चपासून मतदानाला सुरुवात होईल. मतमोजणी 2 मे रोजी होणार. केरळ, तमिळनाडूत आणि पुदुच्चेरीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 6 एप्रिलला मतदान होईल आणि 2 मे रोजी मतमोजणी आणि निकाल लागेल. आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एका फेजमध्ये निवडणूक होईल. अधिसूचना जारी होण्याची तारीख 12 मार्च, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 मार्च, उमेदवारी अर्जाची छाननी 20 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 22 मार्च तर मतमोजणी 2 मे रोजी होणार.

तामिळनाडूत विधानसभेच्या 234 जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल. अधिसूचना जारी होण्याची तारीख 12 मार्च, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 मार्च, उमेदवारी अर्जाची छाननी 20 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 22 मार्च, तर मतमोजणी 2 मे रोजी होणार.

केरळमध्ये मतदान 6 एप्रिल रोजी होणार असून अधिसूचना जारी होण्याची तारीख 12 मार्च, उमेदवारी अर्जाची छाननी 20 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 22 मार्च, केरळमध्ये मतदान मतमोजणी 2 मे रोजी होणार.

बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक टप्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 01 एप्रिल, तिसरा टप्पा 06 एप्रिल आणि चौथा टप्पा 10 एप्रिलला होईल. पाचवा टप्पा मतदान 17 एप्रिल, सहावा 22 एप्रिल, सातवा 26 एप्रिल, आठवा टप्पा 29 एप्रिलला होईल. त्यानंतर 2 मे रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

मोदींचं कुंभमेळा प्रतीकात्मक साजरा करण्याचा आवाहन

मोदींचं कुंभमेळा प्रतीकात्मक साजरा करण्याचा आवाहन
कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहता कुंभमेळा आता फक्त प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा, असं ...

राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हाफकिन्स व हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची परवानगी ...

UP Weekend Lockdown: उत्तर प्रदेशात दर रविवारी पूर्ण ...

UP Weekend Lockdown: उत्तर प्रदेशात दर रविवारी पूर्ण लॉकडाउन, मास्क न घालता पकडल्यास 1 हजार रुपये दंड
लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditya Nath) कोरोना व्हायरस इन्फेक्शनच्या दुसऱ्या ...

CBIचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन

CBIचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन
सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी निधन ...

सीएम अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...

सीएम अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिल्लीत शनिवार व रविवार कर्फ्यू लावण्याची घोषणा केली, आवश्यक सेवा सुरू राहतील
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दिल्लीत शनिवार व ...