गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2017 (14:06 IST)

तामिळनाडू : जयललीता यांच्या जागेसाठी निवडणूक

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरके नगर या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. . कारण या जागेसाठी तब्बल 82 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एका जागेसाठी एवढ्या उमेदवारांचे अर्ज येणे ही मोठी समस्याच उभी राहिली आहे.

मतदान केंद्रात केवळ 4 मतदान यंत्र लावता येतात आणि यातील उमेदवारांची मर्यादा 63 असते. त्यामुळे उर्वरित उमेदवारांसाठी काय करायचे, असा प्रश्‍न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे. आरके नगर मतदारसंघात 12 एप्रिल रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. जयललिता यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. शशिकला गट आणि ओ. पन्नीरसेल्वम गटाची इथे प्रमुख लढत असनार आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग उपाय काढत असून शशिकला आणि पनीरसेल्वम यांनी याबाबत निवडणूक प्रतिष्ठा पणाला लावली आहे.