गुजरातच्या दाहोदमध्ये लग्नसमारंभातील जेवणानंतर अचानक ४०० जण आजारी पडले
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील अभ्लोद गावात एका लग्नसमारंभात झालेल्या सामूहिक जेवणानंतर ४०० हून अधिक लोकांना अन्न विषबाधेचा फटका बसला. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने गावात घबराट पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाहुण्यांनी आंब्याचा रस प्यायल्यानंतर रात्री ११ वाजता त्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. ५० हून अधिक गंभीर रुग्णांना दाहोदच्या झायडस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर १५० रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये आहे. गावात डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून २०० जणांवर उपचार सुरू आहे.
गावात घबराट मिळालेल्या माहितीनुसार, पाहुण्यांनी पनीरची भाजी आणि आंब्याचा रस प्यायल्यानंतर रात्री ११ वाजता त्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला.
दाहोद येथील झायडस रुग्णालयात ५० हून अधिक गंभीर रुग्णांना दाखल करण्यात आले आहे, तर १५० रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये आहेत. गावात डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून २०० लोकांवर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य विभागाने अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे.
प्राथमिक अहवालानुसार, आंब्याचा रस किंवा पनीरची भाजी खाल्ल्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे, मात्र लग्नसमारंभात नेमके कोणते अन्न खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अहवाल मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Edited By- Dhanashri Naik