शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 जून 2021 (16:27 IST)

राम मंदिरांच्या नावाने फेक वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे

लाखो राम भक्तांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक बातमी नोएडातून समोर येत आहे. यावर नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असून, पाच जणांना अटक केली आहे.
 
प्रकरण असे आहे की, अयोध्या रामजन्म भूमी ट्रस्टच्या नावाने बनावट वेबसाईट (Shri Ram Janmabhoomi Trust Website) बनवून, कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने 5 जणांना अटक केली आहे. यावेळी पाच आरोपींकडून 5 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 सिम, तब्बल 50 आधार कार्ड, 2 थंब इंप्रेशन मशीन असे साहित्य जप्त केले आहे.
 
नेमके प्रकरण काय?
सदर आरोपी सध्या दिल्लीत राहत होते. मुख्य म्हणजे सर्व आरोपी इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी असल्याचीही माहिती आहे. सदर आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या (Ayodhya Ram Mandir) या नावाने एक वेबसाईट सुरू केली. हे सर्व काम बेकायदेशीररित्या सुरू होते, तसेच याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, ज्यांना रामजन्म भूमीसाठी दान करायचे आहे, त्यांच्यासाठी एक बँक अकाउंट नंबर देण्यात आला होता.
 
जानेवारी महिन्यात राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल कुमार मिश्रा यांनी अयोध्यातील रामजन्म भूमी ठाण्यात रिपोर्ट दाखल केला होता, की राम जन्मभूमी ट्रस्टच्या वेबसाईटवर लोक मंदिराच्या निर्माणासाठी देणगी जमा करत आहेत. मात्र ज्यावेळी काही राम भक्तांनी त्यांनी जमा केलेल्या देणगीबाबत विचारपूस केली, त्यावेळी दिलेले पैसे ट्रस्टच्या खात्यात पोहोचले नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
याच दरम्यान तपास सुरू झाला, आणि तपासात असे आढळले, की फेक वेबसाईट बनवून इंटरनेटवर लोकांना त्या फेक वेबसाईटवरील बँक खात्यात देणगी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या बँक खात्याचा तपास करण्यात आल्यानंतर फेक वेबसाईटवर हे खाते उघडण्यात आल्याचे समोर आले आणि, याच खात्यात लाखो राम भक्तांनी त्यांचे पैसे मंदिरासाठी जमा केले होते.