शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (08:23 IST)

युपी आणि आपले महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य ; राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल

महिलांच्या सुरक्षेबाबतचा राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात धक्का देणारे खुलासे केले आहेत. अहवालात महिलांसाठी उत्तर प्रदेश असुरक्षित राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर महिलांसाठी असुरक्षित राज्यांमध्ये आपले  महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.तर देशातील लक्षद्वीप महिलांसाठी सर्वात सुरक्षित प्रदेश असल्याचं या अहवालात प्रसिद्ध केले आहे.
 
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार देशात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये ६ टक्क्याने वाढ झाली असून, २०१७ मध्ये संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराचे ३,५९, ८४९ गुन्हे नोंद करण्यात आले होते. साल २०१६ मध्ये हा आकडा ३,३८,९५४  इतका मोठा होता. राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न करूनही महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी होतांना काही दिसत नाही. उत्तर प्रदेशात महिलांवरील सर्वाधिक अत्याचाराची नोंद झाली असून, उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराचे ५६,०११ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. म्हणजे संपूर्ण देशातील महिलांवरील अत्याचाराच्या १५.६ टक्के गुन्हे फक्त उत्तर प्रदेशात राज्यात नोंदवले आहे. तर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या ३१,९७९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
 
पुढे या यादीत पश्चिम बंगालचा तिसरा क्रमांक असून, महिलांवरील अत्याचाराचे ३०,९९२ गुन्हे दाखल झाले आहेत. मध्यप्रदेशात २९,७८८ आणि राजस्थानात २५,९९३ गुन्हे दाखल झाले आहेत. 
 
लक्षद्वीपमध्ये फक्त ६ गुन्हे
महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये लक्षद्वीपचा प्रथम क्रमांक असून, लक्षद्वीपमध्ये महिलांवरील अत्याचाराचे केवळ ६ गुन्हे दाखल झाले. तर  दादरा-नगर हवेली २०, दमन-दीवमध्ये २६, नागालँडमध्ये ७९ आणि पुदूचेरीमध्ये १४७ गुन्हे दाखल झाले आहेत.
 
बलात्कार, हत्येचं प्रमाणही महाराष्ट्रात अधिक
महिलांवरील बलात्कार, सामुहिक बलात्कार, त्यांच्या हत्या करण्याचे सर्वाधिक गुन्हेही उत्तर प्रदेशात नोंद असून, उत्तर प्रदेशात हे एकूण गंभीर असे ६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आसाममध्ये २७, महाराष्ट्रात २६, मध्यप्रदेशात २१ आणि ओडिशामध्ये ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.