1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. wife alleged that husband is gay following which he attempted to strangle her

'लग्नाच्या रात्रीपासून स्पर्शही केला नाही...' नोएडामध्ये पतीच्या समलैंगिकतेचे सत्य उघडकीला; पत्नीवर जीवघेणा हल्ला

नोएडा शहरातून वैवाहिक नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला धक्का देणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. लग्नाच्या रात्रीपासून ते हनिमूनपर्यंत पतीने पत्नीला स्पर्श करणे टाळले. अखेर एका वर्षानंतर पतीच्या समलैंगिकतेचे धक्कादायक सत्य वैद्यकीय अहवालातून समोर आले. हे गुपित उघड होताच संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
 
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून नोएडाच्या फेज-२ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गंभीर कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
 
थायलंड हनिमूनदरम्यान हल्ला आणि हुंड्यासाठी छळ
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर-८२ मधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तरुणीचा विवाह १७ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रयागराज येथील एका तरुणाशी झाला होता. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पतीने पत्नीपासून दुरावा ठेवला. दोघे थायलंडला हनिमूनसाठी गेले असता तिथे आरोपी पतीने पत्नीला मारहाण केली, ज्यामुळे त्यांना हनिमून अर्धवट सोडून भारतात परतावे लागले.
 
हुंड्याची मागणी
लग्नानंतर सासरच्या मंडळींनी फ्लॅट आणि आलिशान कारची मागणी करत पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.
 
वैद्यकीय तपासणीत सत्य समोर; डॉक्टरांशीही झटापट
लग्नाला जवळपास एक वर्ष उलटल्यानंतरही पतीच्या वागण्यात कोणताही बदल न झाल्याने पीडितेने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीच्या अहवालात पती समलैंगिक असल्याचे स्पष्ट झाले.
 
गुपित उघड होताच पळ काढला
आपला वैद्यकीय अहवाल पाहताच आरोपीने संतापाच्या भरात डॉक्टरांशी झटापट केली आणि हॉस्पिटलमधून पळ काढला.
 
गळा आवळून हत्येचा प्रयत्न आणि पोलिसांत धाव
सत्य समोर आल्यानंतर पीडितेने या फसवणुकीचा विरोध केला. यावरून चिडलेल्या आरोपी पतीने तिची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेचा आरोप आहे की, तिच्या नणंद आणि दीराने पतीच्या समलैंगिकतेची माहिती असूनही ती लपवून हे लग्न लावून दिले आणि या फसवणुकीत आरोपीला पूर्ण साथ दिली.
 
डिसेंबर २०२५ पासून पीडित महिला आपल्या माहेरी राहत असून तिने अखेर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलीस सध्या आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करत असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पुढील लेख
LIVE: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य आंदोलन