गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

अण्णा - सोनिया गांधी यांची भेट रद्द!

कॉंग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व अण्णा हजारे यांची आज होणारी भेट रद्द झाली आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना कॉंग्रेस नेते टॉम वडक्कन म्हणाले, "सोनिया गांधी व अण्णा हजारे यांची जी बैठक होणार होती, ती आज होणार नाही. ही बैठक नंतर घेण्यात येईल.''

आता ही बैठक नक्की कधी होणार आहे, याबाबत कोणतीही निश्‍चित वेळ आम्हाला अजून देण्यात आली नाही, असे सांगण्यात आल आहे.