शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

अन्नसुरक्षा विधेयकावर २ आठवड्यांत निर्णय?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारचे महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा विधेयक देशभरात कोणत्या पद्धतीने लागू करायचे, या विषयी काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. हे विधेयक अधिसूचनेच्या स्वरुपात लागू करायचे की, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायचे, या पर्यायांची चाचपणी घेण्यात येत आहे. या विषयी येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येत आहे. शिवाय या विधेयकातील महत्त्वाच्या बाबी देशभर लागू करण्यासाठी कार्यकारी आदेश लागू करायचा, या विषयी विचार करण्यात येत असल्याचे केंद्रीय अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी सांगितले. ‘यूपीए २’ सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा विधेयकात देशातील ६७ टक्के जनतेपर्यंत रास्त दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याची हमी देण्यात आली असून, हे विधेयक म्हणजे जगातील सर्वांत मोठी कल्याणकारी योजना असेल.