गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: श्रीनगर , सोमवार, 11 फेब्रुवारी 2013 (12:38 IST)

अफजल गुरूच्या फाशीने उमर अब्दुल्ला नाराज

FILE
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरूला फाशी देण्यावर नाराजी व्यक्त केली असून यामुळे खोर्‍यातील तरूण परत अन्यायाच्या भावनेत होरपडून निघेल, असे त्यांनी म्हटले आहे.

फासावर चढवण्याअगोदर अफजल यांस कुटुंबीयास भेटू देण्यात आले नाही, हे दु:खद आहे. हा प्रश्न काश्मीरच्या तरूणांच्या भविष्याशी निगडीत असून चिंतेचा विषय आहे. फाशीने या तरूण पीढीस न्याय्य वागणूक मिळणार नसल्याची भावना परत दृढ झाली असून सुरक्षेसारख्या तत्कालीन प्रश्नापेक्षा हे अधिक चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.