शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 18 फेब्रुवारी 2013 (13:17 IST)

अफजल गुरूने शेवटच्या पत्रात पत्नीस काय लिहिले होते?

PR
FILE
अफजल गुरूने फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याअगोदर पत्नीस लिहिलेले पत्र सार्वजनिक झाले आहे. आपल्या मृत्यूवर शोक व्यक्त न करता आपण प्राप्त केलेल्या दर्जाचा सन्मा करावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती.

अफजलने उर्दूत लिहिलेले पत्र त्याच्या कुटुंबीयांनी ईमेल करून प्रसारमाध्यम व सोशल साइट्सना पाठवले आहे. अफजलने 9 फेब्रुवारीस सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले, 'मला शहिदत्व प्रदान करण्यासाठी अल्लाचे आभार. प्रत्येक क्षणी सत्याची साथ देणार्‍यांना शुभेच्छा व माझा अंत सत्यासाठी झाला आहे'.

फासावर जाण्याअगोदर त्याने पत्नीस पत्र लिहिण्यासाठी पेन व कागद मागितला होता. यामध्ये त्यावेळचे विचार व्यक्त झाले आहेत. (वेबदुनिया/भाषा)