शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीनगर , सोमवार, 29 जून 2015 (12:48 IST)

अमरनाथमध्ये यंदा होतील 13 फूटच्या शिवलिंगाचे दर्शन

समुद्रतळापासून किमान 3888 मीटर उंचीवर स्थित पवित्र अमरनाथच्या गुहेत बाबा बर्फांनी आपल्या संपूर्ण आकारात आले आहे. या वर्षी गुहेत शिवलिंगाची उंची किमान 13 फूट आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यास आता फक्त 2 दिवस उरले आहे. ही यात्रा 2 जुलैपासून सुरू होत आहे ज्यात भाविक आपल्या आराध्य देवाचे दर्शन घेऊ शकतात. अमरनाथच्या पवित्र गुहेला अमेरश्वर गुहा देखील म्हणतात. याच पवित्र गुहेत महादेवाने पार्वतीला अमरत्वाची कथा सुनावली होती. प्रत्येक वर्षी अमरनाथ यात्रा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होते.  
 
यंदा बर्फबारी जास्त झाली आहे 
जम्मू-काश्मीर खोर्‍यात या वर्षी बर्फबारी जास्त झाली आहे. यामुळे अमरनाथ गुहेत मंदिरात शिवलिंग जास्त उंच आहे. या वेळेस पवित्र शिवलिंगाची उंची मागील वर्षांच्या सरासरी 10-11 फूटच्या तुलनेत यंदा 13 फूट आहे. मुख्य यात्रा अधिकारी बशीर अहमद खान यांनी   पत्रकारांना सांगितले की, 'या वर्षी घाटीत जास्त बर्फबारी झाली आहे, त्यामुळे तापमान कमी झाल्याने पवित्र शिवलिंगाचे निर्माण उत्तम झाला आहे.' ते म्हणाले, 'या वर्षी शिवलिंगाची उंची जास्त राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जास्त भाविक येण्याची उमेद आहे.'
 
ऑन द स्पॉट नोंदणीची व्यवस्था  
अमरनाथ यात्रेसाठी या वेळेस पहिली टोळी 1 जुलै रोजी रवाना होणार आहे. जर मोसम ठीक राहिला तर पहिल्या टोळीचे श्रद्धाळू त्याच  दिवशी संध्याकाळी बाबा बफार्नीचे दर्शन घेऊ शकतात. भाविकांच्या सेवेसाठी 150 पेक्षा अधिक लंगरांची व्यवस्था केली आहे. प्रतिदिन किमान 15 हजार भाविकांना पहलगाम आणि बालटालच्या रस्त्या यात्रेत सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत किमान अडीच लाख भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केले आहे. 30 जूनपासून ऑन द स्पॉट पंजीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.  
 
सुरक्षेची जबाबदारी सेनांवर    
यात्रेची मानक संचालन प्रक्रिया (एसओपी)चे पालन करण्यासाठी विभागांना कडक आदेश देण्यात आले आहे.' पोलिस महानिरीक्षक (काश्मीर प्रभाग) एस.जे.एम गिलानी यांनी आठवड्याच्या सुरुवातीत म्हटले होते की भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व सोयी इंतजाम करण्यात आल्या आहे. रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप समेत सर्व संवेदनशील स्थळांवर सुरक्षा-व्यवस्था कडक करण्यात आली आहे.