गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2011 (12:30 IST)

एफडीआय शेतकरी व ग्राहकांच्या फायद्याचे : शरद पवार

एफडीआयला घाबरण्याचे कारण नाही. एफडीआय हे ग्राहक व शेतकरी या दोघांच्याही फायद्याचे आहे. एफडीआयमुळे गल्लीबोळात मॉल सुरू होती, असा बाऊ करून विरोधकांनी संसदेचे कामकाज बंध पाडले आहे. हे लोकशाहीला घातक असून एफडीआयचा बाऊ करू नका, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे.

एफडीआय आल्यानंतर छोटी दुकाने बंद होतील, ही भिती चुकीची असून दहा लाख लोकसंख्‍या असलेल्या शहरातच असे मॉल होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. छोटी दुकाने ही गल्लीत, छोट्या गावात असतात. त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होणार नाही. उलट अशा मॉलमध्ये शेतकर्‍यांच्या मालास चांगला भाव मिळतो व ग्राहकांना माफक दरात माल उपलब्ध होतो. त्यामुळे एफडीआय फायद्याचे आहे.