शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

काँग्रेस सत्ता असणार्‍यारा राज्यांना 9 सिलिंडर

WD
काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी आज येथे या निर्णयाची घोषणा केली की आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये एका कुटुंबाला ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात देण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव सिलिंडरवरील अनुदानाचा भार राज्य सरकार उचलणार आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, आसाम, आंध्रप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आदी राज्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

गत आठवड्यात केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ सहा अनुदानित सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. या निर्णयावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आज अखेर काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या राज्यांत सहा ऐवजी नऊ अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला. आजच्या या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांतील नागरिकांना नऊ सिलिंडर अनुदानित दरात मिळतील. तर दहाव्या सिलिंडरला ७५0 ते ८00 रुपये मोजावे लागतील. तूर्तास अनुदानित सिलिंडरचा दर ३९९ (दिल्ली) रुपये आहे. त्यावर ३५0 रुपये अनुदान मिळते.