गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 3 मार्च 2016 (08:55 IST)

काळ्या पैशांसंदर्भात मोदींची ‘फेअर अँण्ड लव्हली’योजना

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. काळ्या पैशांसंदर्भात अर्थसंकल्पातील धोरणांवर कडाडून टीका करतानाच काळा पैसा गोरा करण्यासाठी मोदींनी ‘फेअर अँण्ड लव्हली’योजना आणली आहे, अशी खिल्ली उडवली.
 
लोकसभेत बोलताना राहुल गांधी आक्रमक झाले होते. वेमुला आत्महत्या, जेएनयू वाद, राष्ट्रवाद, काळा पैसा आणि महागाईसह अनेक मुद्दय़ांवरून गांधींनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी कुणाचेही ऐकत नाहीत. त्यांच्या मताप्रमाणेच ते काम करत आहेत. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे, अशी टीका गांधींनी केली.
 
राहुल गांधी यांनी हैदराबाद येथील दलित विद्यार्थी रोहित रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला.  
 
राहुल गांधी म्हणाले
 
* हा देश म्हणजे पंतप्रधान नाही आणि पंतप्रधान म्हणजे देश नव्हे.
 
* कन्हैा कुमारच भाषणात एकही देशविरोधी शब्द नव्हता. जेएनूतील विद्यार्थना विनाकारण टार्गेट केले जात आहे.
 
* मोदींनी रोहित वेमुलाच आईला ङ्खोन केला नाही, तचबद्दल ते काहीच बोलले नाहीत.
 
* गांधींजी आमचे, सावरकर तुमचे. सावरकर तुमचे नाहीत का? तंना उचलून फेकून दिले का? उत्तर द्या.
 
* मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नाही, हीच माझी चूक.
 
* आवाज दाबल्याने रोहित वेमुलाची आत्महत्या.
 
* मोदींनी रोजगाराचे दिलेलं आश्वासन पाळले नाही.
 
* डाळ 200 रुपये किलोवर कशी गेली?
 
* सरकारची ‘फेअर अँण्ड लव्हली’योजना.
 
* काळा पैसा सफेद करण्याची योजना.