शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 31 मार्च 2015 (14:45 IST)

काश्मिरात अडकले महाराष्ट्रातील पर्यटक

संततधार पावसाने काश्मिरात झेलम नदीत  पुराने थैमान घातल्याने हाहाकार उडालेला असून उन्हाळी सुटीच्यानिमित्ताने तिकडे गेलेले महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक अडकले आहेत. ते  सुरक्षित असले तरी पूर उतरल्याशिवाय त्यांची सुटका होणार नाही.

काश्मिरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे झेलमने धोक्याची पातळी ओलांडली असून आत्तापर्यंत २१ लोक बेपत्ता आहेत. पूरस्थिती जाहीर केली आहे. दरम्यान, उन्हाळी सुटीसाठी महाराष्टÑातील शेकडो पर्यटक त्याठिकाणी गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुण्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. या पर्यटकांशी मोबाईलवरुन संपर्क होत असल्याने ते सुखरुप आहेत मात्र, ते हॉटेमध्ये अडकून पडले आहेत. पूरस्थिती ओसल्याशिवाय त्यांची सुटका होणे अशक्य आहे.