गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 16 ऑगस्ट 2016 (11:18 IST)

काश्मीर मुद्यावर चर्चेस या : पाकिस्तान

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बांबावले यांना चर्चेचे निमंत्रण पत्र दिले. काश्मीर मुद्यावर तोडगा काढणे दोन्ही देशांचे कर्तव्य आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर भारत-पाकिस्तानमधील वादाचे मुख्य कारण आहे असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकारीया यांनी सांगितले. या कुरापतखोरीमुळे दोन्ही देशात तणाव आणखी वाढू शकतो. भारताला पाकिस्तानबरोबर फक्त पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करण्याची इच्छा आहे.

जम्मू-काश्मीरवर चर्चेचा प्रश्नच येत नाही असे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी गौतम बंबावले यांना  बोलवून जम्मू-काश्मीर मुद्यावर चर्चेसाठी पाकिस्तानात या असे निमंत्रण दिले.