गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: श्रीनगर , सोमवार, 13 फेब्रुवारी 2012 (12:34 IST)

काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी

काश्मीर खोर्‍यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला असून, गुलमर्ग येथे रात्रभर बर्फवृष्टी झाली आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनाच्या ठिकाणी तापमान उणे 1.4 अंश सेल्सिअस इतके होते आणि तेथे 8.4 मीलिमीटर पावसाची नोंद झाली.

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा शहरात पारा उणे 0.3 अंश सेल्सियसवर आला होता. या भागात 7.7 मीलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र सर्वात जास्त थंडी गुलमर्ग येथे होती. तेथे सर्वात कमी म्हणजे उणे 6.5 अंश सेल्सियर इतके तापमान नोंदवण्यात आले.