शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सिमला , मंगळवार, 8 डिसेंबर 2015 (11:16 IST)

किरतपूर - मनाली हायवेवर दरडी कोसळल्याने वाहतूक बंद (पहा व्हिडिओ)

हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील हानोगीजवळ मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने किरतपूर-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. 
 

जिल्हा प्रशासनाने बाजौरा-कोटला मार्गे वाहतूक वळविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. या महामार्गावर उंच पर्वतावरील मोठमोठे दगड अचानक घरंगळत खाली आले. हे दगड महामार्गावर येऊन पडल्याने रस्ता बंद झाला.