शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , शनिवार, 6 ऑगस्ट 2016 (12:22 IST)

कोण आहे, विजय रूपानी!

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रविवारी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला होता. गुजरातमधील पटेल समाजाचं आरक्षणासाठी झालेलं आंदोलन, उनामधील दलितांवरील अत्याचाराचं प्रकरण, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यामुळे आनंदीबेन पटेल यांच्या सरकारवर टीका करण्यात आली. त्यानंतर त्यांना पायउतार व्हाव लागलं. येत्या वर्षभरात गुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे रुपानी भाजपला यश मिळवून देणार का प्रश्न आहे. तर जाणून घेऊ कोण आहे विजय रूपानी.  
 
- स्वच्छ प्रतिमा असणारे विजय रूपानी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 येथे गुजरातच्या एका लहान गावात झाला होता.  
- विजय रूपानी यांनी बीए एलएलबीपर्यंत अभ्यास केला आहे.   
- विजय रूपानी सौराष्ट्राहून आहे जेथे जैन धर्माला मानणारे लोक जास्त आहे. विजय रूपानी पण जैन समुदायाचे आहे.   
- विजय रूपानी यांनी एक छात्र नेता म्हणून आपला करियर स्टार्ट केला होता.   
- विजय रूपानी यांनी 1971मध्ये जनसंघाला ज्वाइन केले होते.   
- रूपानी राजकोटचे विधायक आहे आणि या अगोदर भाजपा महासचिव आणि राज्‍यसभा संसद राहिले आहे.   
- स्वच्छ प्रतिमा , मोहक व्यक्तित्व आणि व्यवस्थित काम करणारे रूपानी यांना पीएम मोदी आणि अमित शाहचे फारच जवळचे मानले जाते.  
- म्हणूनच विजय रूपानी 2017 विधानसभा निवडणुकीचे ध्यानात घेऊन पक्ष अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. 
- तरुणांमध्ये देखील विजय रूपानी फार लोकप्रिय आहे.   
- गुजरात भाजपचे अध्यक्ष होण्याशिवाय गुजरात सरकारमध्ये ट्रांसपोर्ट मंत्री देखील राहिले आहे आणि ते गुजरातच्या  रजकारणाला फारच चं चांगल्या प्रकारे ओळखतात.   
- केशुभाई पटेलच्या काळापासून पक्षाने यांना मेनिफेस्‍टो कमिटीचे अध्यक्ष बनवले होते.   
- 60 वर्षाचे विजय रूपानी गुजरात भाजपचे 10वे अध्यक्ष म्हणून पद सांभाळत आहे.   
- रूपानी यांनी 2007 आणि 2012च्या विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्र-कच्‍छ भागात फारच उत्तमप्रकारे निवडणुकीचे मॅनेजमेंट केले होते जेथे फार चांगल्या प्रकारे भाजपने विजय मिळविला होता.  
- मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी मागील वर्षी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात विजय रूपानी यांना ट्रांसपोर्ट, वाटर सप्लायी, श्रम आणि रोजगार सारर्‍या विभागाची जबाबदारी सोपवली होती.  
- विजय रूपानीबद्दल असे म्हटले जाते की त्यांचे प्रदेशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध राहिले आहे. कुठल्याही प्रकारचा विवादात त्यांचे नाव फारच कमी ऐकण्यात आले आहे.