शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नाहन , शनिवार, 17 ऑक्टोबर 2015 (11:17 IST)

गायींची तस्करी करणार्‍यास ठार मारले

हिमाचल प्रदेशमध्ये गायींची तस्करी करणार्‍यास जमावाने मारहाण करुन ठार मारले. सिरमौर जिल्ह्यात काही नागरिक एका ट्रकमधून पाच गाई व दहा बैल नेत असताना तेथील स्थानिकांनी पाहिले. ट्रकचालकाने तो ट्रक लवासा चौकाजवळ थांबवून काही गाईंना ट्रकच्या बाहेर फेकले. मात्र त्यात एक गाय मृत्यूमुखी पडली तर इतर गाई जखमी झाल्या.

ट्रकचालक व इतर लोक जंगलात पळून गेले. मात्र पोलिस व स्थानिकांनी त्यांचा जंगलातही पाठलाग केला आणि त्यांना पकडले. स्थानिकांनी त्या तस्करांना मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. या मारहाणीत जखमी झालेल्या नोमान या २८ वर्षीय तरूणाचा रुग्णालयातील उपचारांदरम्यान मृत्यू झाला.