गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

चीन-भारत सीमाप्रश्नी भारताची सावध भूमिका

सीमेसंदर्भात चीनची आगळीक वाढत चालली असली तरी, भारताने याबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. चीनने नुकतेच जारी केलेल्या 'ई-पासपोर्ट'वर अरुणाचल प्रदेश व अक्साई चीन हा चीनचा भाग दर्शविण्यात आला आहे. हा मुद्दा उभय देशांदरम्यानच्या चर्चेदरम्यान चर्चिला जाईल, असे भारताचे सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी सांगितले.