बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Updated :नवी दिल्ली , गुरूवार, 14 ऑगस्ट 2014 (16:09 IST)

दिल्लीत जेट एअरवेजच्या विमानाला आग!

जेट एअरवेजच्या एका विमानाला  दिल्ली विमानतळावर अचानक आग लागली. ही घटना आज सकाळी घडली. अपघातग्रस्त विमान दिल्लीहून भोपाळसाठी निघाले होते. विमानाने उड्डाण घेताच कॉकपिटमधील फायर आलार्म वाजला. विमानात 80 प्रवाशी बसले होते. दुसरीकडे विमानाचा एक पायलट झोपला होता तर दुसरा पायलट टॅबलेट वापरण्‍यात व्यग्र होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-भोपाळ विमानाने आज सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास जेट एअरवेजचे '9W-2654'हे विमान रवाना झाले होते. विमानात 80 प्रवाशी होते. विमान धावपट्टीवर उड्डाण घेत असताना कॉकपीटमध्ये फायर आलार्म वाजला. विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनला आग लागल्याने सर्वत्र धूर पसरला होता.या धुरामुळे फायर आलार्म वाजला. क्रु मेंबर्सच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. विमानातील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. इंजिनला आग लागल्याचे कळताच सर्व प्रवाशी विमानाबाहेर काढण्यास यश आले. या सर्व प्रवाशांना दुसर्‍या विमानाने भोपाळला पाठवण्यात आले आहे. नागरी विमान महासंचलनालय (डीसीजीओ) तसेच जेट एअरवेजने तपास या घटनेचा तपास सुरू केला आहे.