मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 28 मार्च 2016 (10:50 IST)

धीरूभाई, खेर, सायना यांना पद्म अवॉर्डने संन्मानित करतील राष्ट्रपती

रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन, सिनेअभिनेते अनुपम खेर व अजय देवगण तथा बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासह एकूण ५६ प्रतिष्ठित नागरिकांचा सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
 
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर, नृत्यांगणा यामिनी कृष्णमूर्ती, माजी कॅग विनोद राय, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर आणि ख्यातनाम शेफ मोहम्मद इम्तियाज कुरेशी यांचाही राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळय़ात पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. या सोहळय़ात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ५ पद्मविभूषण, ८ पद्मभूषण व ४३ पद्मश्री पुरस्कारांचे वितरण करतील. धीरूभाई हिराचंद अंबानी (मरणोत्तर), अविनाश कमलाकर दीक्षित, जगमोहन, यामिनी कृष्णमूर्ती व श्रीश्री रविशंकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील ११२ जणांची प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी निवड केली होती. सिनेस्टार रजनीकांत, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, टेनिसपटू सानिया मिर्झा आदींना पुढील महिन्यातील एका कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण केले जाईल.