शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2012 (10:23 IST)

नऊ महिन्यांनी कलमाडी जेलबाहेर

राष्ट्रकुल स्पर्धा ऑक्टोबर 2010 मध्ये दिल्लीत झाली होती. या स्पर्धेच्या संयोजक समितीचे कलमाडी अध्यक्ष होते. त्यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुमारे 1700 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना 25 एप्रिल 2011 रोजी सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला मात्र, तो फेटाळला होता. कलमाडी हे राजकीय नेते आहेत. ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असे कारण जामीन नाकारताना न्यायायलाने दिले होते.

या घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे तसेच कलमाडींची तब्येतही बरी नाही, असे कारण देत त्यांच्या वकीलाने कलमाडी यांना जामीन मंजूर करण्याची विनंती केली. कलमाडींची बाजू समजून घेतल्यावर न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण संस्‍थाची बाजू जाणून घेतली व कलमाडींना जामील दिला.