शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2016 (17:02 IST)

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर महिलेने फेकली कुंडी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्याच्या ताफ्यावर एका महिलेने झाडाची कुंडी फेकल्याची घटना घडली आहे. रायसीना हिलवरून मोदींचा ताफा पुढे जाताना ही घटना घडली असून सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने अशी चूक होणे चिंतेचा विषय आहे. 
 
सूत्रांप्रमाणे कुंडी फेण्यापूर्वी ती महिला त्यांच्याविरोधात घोषणा देत होती. या घटनेनंतर पोलिस महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करत आहे. साहिबाबाद रहिवाशी या महिलेला पंतप्रधान कार्यालयात येण्याची परवानगी नाकारल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.