शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2015 (17:33 IST)

पीएम मोदी सार्क बैठकीसाठी पुढच्या वर्षी पाकिस्तानात जाणार

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षात सार्क शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी पाकिस्तानची यात्रा करणार आहे. पाकिस्तानच्या एका प्रमुख टीव्ही चॅनलने सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षात होणार्‍या सार्क शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या दौर्‍यावर येतील.  
 
हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी त्या पाकिस्तानमध्ये आल्या असून त्यांनी मोदींच्या उपस्थितीबद्दल माहिती दिली आहे पण अद्याप भारतीय अधिकार्‍यांनी या प्रकारचे कुठलेही बयान देण्यास नकार दिला आहे.  
     
स्वराज यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेतली असून दळणवळण, दहशतवाद आदी मुद्द्यांवर चर्चा केली. जवळपास अर्धा तास झालेल्या या चर्चेमध्ये अफगाणिस्तान पाकिस्तानच्या ट्रेड अँड ट्रान्झिट अग्रीमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी भारत उत्सुक असल्याचेही स्वराज यांनी सांगितले आहे.