शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 3 डिसेंबर 2008 (17:50 IST)

भारत-रशिया द्विपक्षीय सहकार्य वाढवणार

भारत रशिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर झुकोव्ह यांनी परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आहे. व्यापार, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी दोन देशांतील परिषदेचे दोघांनीही अध्यक्षपद भूषवले.

जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देश आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणार आहेत. दोन्ही देशांनी २०१० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १० बिलियन डॉलरपर्यंत पोहचवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

यावर्षात द्विपक्षीय व्यापारात वृद्धी झाली असून वर्ष २००८ मधील पहिल्या नऊ महिन्यात ४१.६ टक्क्यांनी व्यापार वृद्धी झाली आहे. द्विपक्षीय व्यापार एकूण ३.८ बिलियन डॉलरपर्यंत पोहचला आहे.

मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे. रशियन अध्यक्ष दिमित्री मेदव्हदेव हे ४ डिसेंबरपासून भारत भेटीवर येणार असून त्याअगोदर परिषदेची ही वार्षिक बैठक झाली आहे.