शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 23 जुलै 2016 (11:17 IST)

मराठवाड्यातील 100 मुस्लीम युवक इसीसमध्ये?

मराठवाड्यातील सुमारे 100 मुस्लीम युवक बेपत्ता असून ते इसीस या दहशतवादी संघटनेमध्ये दाखल झाल्याचा संशयआहे. शिवसेनेचे परभणीचे आमदार राहूल पाटील यांनी असे मत व्यक्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
परभणीच्या नासीरबीन चाऊसला नुकतीच इसीसच्या संपर्कात आल्याच्या आरोपातून अटक झाली आहे. त्याने बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्याचाही खुलासा समोर आला आहे. त्यामुळे यावर आपले मत मांडताना शिवसेनेचे आमदार राहूल पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. नासीरबीनला अटक झाल्यानंतर एमआयएम मुस्लिम तरूणांना भडकावत असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे.