शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मल्ल्या प्रकरण व हेलिकॉप्टर चौकशीसाठी ‘एसआयटी’

नवी दिल्ली- ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळा व विजय मल्ल्या प्रकरणाची वेगाने चौकशी करण्यसाठी सीबीआने अतिरिक्त संचालकांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ची स्थापना केली.
 
फिनमेकानिका व ऑगस्टा वेस्टलॅण्डच माजी प्रमुखांना इटालिन कोर्टाने अलीकडेच हेलिकॉप्टर प्रकरणात दोषी ठरविले होते. 3600 कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर विक्री करार भारताच संरक्षण मंत्रालयाशी करीत असताना 125 कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचे मिलान न्यायालयाचा निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.
 
ब्रिटनस्थित ऑगस्टा वेस्टलॅण्डने काही भारतीयांना लाच दिल्याचे स्पष्ट झाले असले तरी व्यक्तींची नावे जाहीर झालेली नाहीत. किंगफिशर एअरलाइन्सने घेतलेल्या कोटय़वधी रुपयांच्या थकित कर्जाचे प्रकरणाचीही सीबीआयने नेमलेली ‘एसआयटी’ चौकशी करणार आहे.
 
1984 च्या आयपीएस बॅचचे राकेश अस्थना ‘एसआयटी’चे प्रमुख असणार आहेत.