गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (12:10 IST)

माझ्या वक्तव्याचा विपर्यास: शाहरुख

मुंबई- भारतात खूप असहिष्णुता असल्याचे मी म्हणालोच नाही, असे शाहरुख खान एक कार्यक्रमादरम्यान म्हणाला. मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्या आला, असे त्याने म्हटले.
 
भारतात मोठ्या प्रमाणावर असहिष्णुता अस्तित्वात असल्याचे मत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या 50 व्या वाढदिवशी व्यक्त केले होते. त्यानंतर शाहरुखवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. आमीरने सोमवारी केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटत असल्याचे चित्र आहे. 
 
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना शाहरुख म्हणाला, ‘मी काहीतरी बोललो आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, आणि त्यामुळे मी अडचणीत पडलो. ते त्रासदायक होते. भारत असहिष्णू आहे, असे मी कधीच बोललो नाही. उलट मला याविषयाबद्दल विचारले असता, बोलण्यात मी रस दाखविला नाही. तरीही मला असहिष्णुतेबाबत सतत प्रश्न विचारले गेले, त्यावर तरुणांनी धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी देश बनविण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करावे, इतकेच मी म्हणालो होतो.‘‘ 
 
‘लोकांना ज्यावर विश्वास ठेवावासा वाटतो त्यावर ते ठेवतात; पण जे दाखवण्यात आले तसा माझ्या बोलण्याचा अर्थच नव्हता. यामुळे मी खूप निराश झालो आहे. मी एक अभिनेता असून, चित्रपट करतो आणि हे माझ्यासाठी पुरेसे आहे. मी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे काही लोकांना प्रेरणा मिळते आणि हेच काम मी करावे, असे मला वाटते,‘‘ असे शाहरुखने म्हटले आहे.