शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 जुलै 2015 (09:37 IST)

याकूबसाठीचा भाईचारा सलमानला ठरला महागात

मुंबई- 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला अभिनेता सलमान खानने विरोध केला आहे. सलमानने याकूबच्या बचावासाठी तब्बल 14 टि्वटस केले असून टायगर मेमनच्या गुन्ह्यासाठी त्याचा भाऊ याकूबला फाशी कशासाठी?, असा थेट सवाल करत त्याने न्यायव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. याकूबसाठीचा भाईचारा सलमानला खूपच महागात पडला.
 
याकूब मेमनच्या बचावाचे सर्व दोर जवळपास कापले गेले आहेत. सरकारी पातळीवर त्याला फाशी देण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. असे असताना सलमान खानने याकूबच्या शिक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. सलमानने रात्री 1 वाजून 52 मिनिटांनी टायगरला फासावर लटकवा, असा टि्वट केला. त्यानंतर 2 वाजून 41 मिनिटांपर्यंत एकामागून एक ट्विटची मालिका लावत सलमानने याकूबाचा जोरदार बचाव करण्याचा प्रयत्न केला.
 
सलमानच टिट्नंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर अखेर सलमानने त्याचे पहिले टि्वट मागे घेतले व या वादावर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.