शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

योग दिवशी मोदींसोबत तीस हजारांचा सहभाग

चंदीगडमध्ये मुख्य स्थळावर केवळ 30 हजार लोकांचीच व्यवस्था होऊ शकणार आहे. त्यामुळे बाकीच्यांची व्यवस्था शहरातील अन्य स्थळांवर केली जाणार आहे. 
 
ड्रेस रिहर्सल दिवशी कुणाला मुख्य स्थळी प्रवेश द्यायचा हे ठरविले जाणार आहे. चंदीगडमध्ये योगाभ्यासाचे प्रशिक्षण देण्यासाठी सध्या 180 प्रशिक्षण केंद्रे सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले. यंदाचा 21 जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस चंदीगड येथे साजरा केला जात आहे. त्याच्या तयारीसंदर्भात पंतप्रधान मोदींनी बुधवारी आयुष मंत्रालयातील अधिकार्‍यांची बैठक घेऊन माहिती घेतली असून या दिवसासाठी 1 लाख 20 हजार लोकांनी नोंदणी केली असल्याचे समजते. 
 
पंतप्रधान मोदी स्वत: या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आयुष मंत्रालयाचे सचिव अजित सरण यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदीगड योग दिनासाठीची नोंदणी 14 मे रोजी सुरू झाली व 8 जून रोजी संपली. तेव्हा असे आढळले की 1 लाख 20 हजार लोकांनी नोंदणी केली आहे. त्यातील 96 हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.