गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 30 जून 2014 (17:30 IST)

राष्ट्रवादी कॉंग्रेसची मान्यता का रद्द करू नये- निवडणूक आयोग

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता का रद्द करू नये, असे सवाल केंद्रीय निवडणूक आयोगाने केला. यामुळे शरद पवारांच्या यांच्या घड्याळाची टिकटिक केवळ महाराष्ट्रातच वाजू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेससह बहुजन समाजवादी पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचीही राष्ट्रीय मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षांचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतर या पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता का रद्द करु नये? अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे.

आयोगाने बजावलेल्या नोटीशीची मुदत गेल्या 27 जूनलाच संपली आहे. त्यामुळे आता लवकरच हे तिन्ही पक्ष प्रादेशिक होण्याची शक्यता आहे.