शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , सोमवार, 29 ऑगस्ट 2016 (15:34 IST)

विनेशसाठी राष्ट्रपती खाली उतरले!

पैलवान विनेश फोगटला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिओ ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे विनेशला माघार घ्यावी लागली होती. दुखापतीमुळे व्हिलचेअरवर आलेल्या विनेशला सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपतीस्वत: व्यासपीठावरुन खाली उतरले आणि विनेशचा अर्जुन पुरस्काराने गौरव केला.

रौप्यपदक मिळवणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि कांस्यविजेती पैलवान साक्षी मलिक यांच्या सोबतच जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि पिस्टल नेमबाज जीतू राय यांचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कारानं गौरव झाला.

यंदा पहिल्यांदाच चार खेळाडूंना ‘खेलरत्न’ने गौरवण्यात आले.राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं आज राष्ट्रपती भवनात आयोजित  सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी सिंधू, साक्षी, दीपा आणि जीतूला खेलरत्न प्रदान केला. त्याशिवाय यंदा पंधरा खेळाडूंचा अर्जुन पुरस्कारानेही गौरव करण्यात आला.