शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

शिल्पा शेट्टीवर 71 लाख खर्च केले कलमाडींनी!

IFM
युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या नृत्यावर संयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडींच्या इच्छेमुळे ७१.७३ लाख रुपये खर्च केल्याचे उघडकीस आले आहे.

शिल्पा शेट्टीला समारोपाच्या कार्यक्रमात आणण्यासाठी कलमाडी यांनी एका कंपनीच्या दोन प्रमोटर्सला समोर केले होते. या दोघांना सोमवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान ही माहिती दिली. कलमाडींनी ऐनवेळी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी शिल्पा शेट्टीला नृत्यासाठी एवढे पैसे देऊन आणण्यात आल्याचे, यांनी सांगितले.

राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह अन्य 9 जणांवर आरोप निश्चित केले. न्यायालयाने त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट आणि 90 कोटींच्या भ्रष्‍टाचाराचा ठपका ठेवला आहे.

राष्ट्रकुल खेळांसाठी आवश्यक असलेल्या टायमिंग, स्कोरिंग आणि रिझल्ट यंत्रणेचे कंत्राट चढ्या दराने दिल्याचा आणि त्यामुळे सरकारचे 90 कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप सीबीआयने कलमाडींसह 10 जणांवर ठेवला आहे. याप्रकरणी आरोप निश्चित करण्यासाठी विशेष सीमीआयच्या न्यायालयाच्या न्या. रविंदर कौर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.