Last Modified: श्रीनगर , शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (14:36 IST)
श्रीनगरमध्ये पुन्हा इसिसचे झेंडे
पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे दाखवून थेट पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे श्रीनगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर युवकांच्या एका गटाने पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे दाखवत नौहट्टा चौकाकडे मार्च नेला. सुरक्षा जवानांनी त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.