शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2011 (12:24 IST)

संन्यासीपेक्षा उद्योगपती आहे रामदेव बाबा - दिग्विजय सिंह

कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी रामदेव बाबांची खिल्ली उडवत म्हणाले की रामदेव बाबा हे संन्यासी असण्यापेक्षा उद्योगपतीच आहेत.

योग शिकविण्यासाठी रामदेव बाबा ५० हजार रुपयांचे शुल्क घेतात. योग शिकायला येणाऱ्या लोकांपैकी ५० हजार रुपये शुल्क पुढे बसणाऱ्यांसाठी, ३० हजार रुपये शुल्क मध्ये बसणाऱ्यांसाठी आणि १० हजार शुल्क अगदी शेवटी बसणाऱ्यांसाठी घेण्यात येत आहे. हा उद्योग नाही तर दुसरे काय आहे? कॉंग्रेसला रामदेव बाबांची आजिबात भीती वाटत नाही,'' असे सिंह म्हणाले.

रामदेव बाबांचे भय असते, तर आत्तापर्यंत त्यांना अटक झाली असती. मात्र, त्यांचे भय नाही म्हणूनच त्यांच्याबरोबर चर्चा केली जात आहे, असे सिंह यांनी सांगितले आहे.