मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

सचिन व ध्यानचंद यांना भारतरत्न मिळण्याची शक्यता!

देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यासाठीचे निकष आणखी व्यापक करून त्यात क्रीडापटूंचाही समावेश केल्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही भारतरत्न मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. सचिन तेंडुलकर आणि हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची नावे या पुरस्कारासाठी चर्चेत आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावाची शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे.

या पुरस्कारासाठीचे निकष आणखी व्यापक करण्याच्या मागणीला केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पाठिंबा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाच्या या संदर्भातील शिफारशी मान्य केल्या. केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी खेळाडूंनाही भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली होती.