गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 1 डिसेंबर 2008 (13:22 IST)

सर्वपक्षीय बैठकीस शिवसेना अनुपस्थित

मुंबईवर दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर पंतप्रधानांनी बोलावलेल्‍या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेने बहिष्‍कार टाकला असल्‍याची माहिती मिळाली आहे. रविवारी रात्री झालेल्‍या या बैठकीत शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित नव्‍हता.

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी संगितले, की सर्वपक्षीय बैठकीतून काही निष्‍पन्न होणार असेल तरच त्‍यात जाऊन उपयोग होता. कारण सरकारकडून दहशतवादाविरुध्‍द काही पाऊल उचलले जाईल असे वाटत नाही.