गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 29 जून 2016 (10:54 IST)

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरचा जामीन अर्ज फेटाळला

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने तिला क्लीनचिट देण्याच्या एनआयच्या निर्णयावर विशेष एनआयए न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रथमदर्शनी साध्वीचा या बॉम्बस्फोटाशी संबंध आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी शब- ए - बारातच्या दिवशी मशिदीजवळ बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला तर १०१ लोक गंभीररीत्या जखमी झाली. या बॉम्वस्फोटासाठी साध्वीची मोटारसायकल वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

साध्वीविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने व काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने एनआयएने १३ मे रोजी सादर केलेल्या आरोपपत्रातून साध्वी व अन्य दोघांचे नाव आरोपींच्या यादीतून वगळले. तसेच या सर्व आरोपींवरील मोक्का हटवला. त्यामुळे साध्वीने तब्येतीचे कारण पुढे करत व एनआयने दिलेल्या क्लीन चीटच्या आधारावर विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.

या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला नाही. मात्र मालेगाव २००८ बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेत साध्वीच्या जामिनावर आक्षेप घेतला.