शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 25 एप्रिल 2016 (11:48 IST)

‘ड्रीम गर्ल’वर राज्य सरकार मेहरबान

सरकारने 70 कोटींचा भूखंड भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना 1 लाख 75 हजार रुपयांत दिल्याची माहिती समोर आली आहे. हेमा मालिनी यांच्या नाटय़ विहार केंद्रास फक्त 1 लाख 75 हजार (87.5 रु वर्ग मीटर दराने) कोटयावधींचा भूखंड बहाल होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआयमधून मिळाल्याचे सांगितले आहे.
 
हेमामालिनी यांना 1976 च्या बाजारभावाने दिलेल्या भूखंडाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाल्याचा दावाही अनिल गलगली यांनी केला आहे. यासंदर्भात अनिल गलगलींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. भाजपा सरकार राज्याच्या जनतेस फसवित असून एकीकडे छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांच्या संस्थेस कोटयावधीचा भूखंड कसा अल्प दरात मिळाला असा आरोप करते आणि दुसरीकडे हेमामालिनीच्या संस्थेस 70 कोटीचा भूखंड 1.75 लाखांत कसे देते, असा सवाल अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांस पाठविलेल्या पत्रात केला आहे. यापूर्वी हेमामालिनी यांनी अंधेरी तालुक्यातील मौजे वर्सोवा येथील भूखंड 4 एपिल्र 1997 रोजी दिला गेला होता. त्यासाठी हेमा मालिनींच्या संस्थेने 10 लाखांचा भरणा केला. पण त्यातील काही भाग हा सीआरझेडमुळे बाधित होत असल्यामुळे हेमामालिनींनी कुठलेही बांधकाम केले नाही.