1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , शनिवार, 9 जानेवारी 2010 (13:58 IST)

निक इंडिया आता प्रादेशिक भाषेतही!

लहान मुलांच्या आवडीचे असलेल्या चॅनल्स निक इंडिया आता तमिळ आणि तेलगू भाषेतही आपले कार्यक्रम सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नीना एलाविया जयपुरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षातील दुसर्‍या सहामाहीत कंपनी या दोन प्रादेशिक भाषांतील आपले कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात करेल.

निक अमेरिकी वियाकॉम 18 मीडियाची कंपनी आहे. भारतात 2.96 कोटी घरात हे चॅनल पाहिले जात असल्याचे त्या म्हणाल्या. चालू वर्षात कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत 32 टक्क्यांची वाढ होण्याची आशा कंपनीला असल्याचे नीना यांनी स्पष्ट केले.