गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जुलै 2014 (13:42 IST)

स्मार्टफोन वापरात भारतीय आघाडीवर

एरिक्सन या टेलिकॉमसाठी साधने बनविणार्‍या कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात जगात स्मार्टफोन वापरण्यात भारतीय आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या अहवालानुसार भारतीयांत स्मार्टफोन वापराचे प्रमाण दररोज 3 तास 18 मिनिटे इतके आहे तर यूएसमध्ये हेच प्रमाण 2 तास 12 मिनिटे इतके आहे. अन्य कांही आशियाई देशात हे प्रमाण 40 ते 50 मिनिटाच्या दरम्यान आहे. या अहवालाचा उपयोग कोणत्या प्रकारचीडेटा पॅकेज डिझायनरना अधिक फायद्याची ठरतील हे ठरविण्यासाठी होणार आहे.

या अहवालानुसार भारतीय जो वेळ स्मार्टफोनवर घालवितात त्यातील एक तृतीयांश वेळ हा अँप्सवर घालविला जातो. गेल्या दोन वर्षात भारतात अँप्सचा वापर 63 टक्के वाढला आहे व 76 टक्के लोकांनी मोबाइल ब्रॉडबँडने अजून सुविधा दिल्या तर जादा पैसे खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.

एरिक्सनचे उपाध्यक्ष अजय गुप्ता म्हणाले सर्वेक्षणात असेही आढळले आहे की दिवसातून किमान 77 वेळा सस्मार्टफोन चेक करणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक असून 100 पेक्षा जास्त वेळा फोन चेक करणार्‍यांचे प्रमाण 26 टक्के आहे. त्याचप्रमाणे व्हाटस अँप, वुई चॅट यासारख्या अँपचा वापर व्यावसायिक कारणांसाठीही केला जात आहे. नोकरदारांमध्ये ऑनलाइन खरेदीसाठी स्मार्टफोनचा वापर अधिक आहे.

स्मार्टफोनवर व्हिडीओ प्लेअर्सची संख्याही जास्त असून 12 टक्के गृहिणी घरातील अन्य व्यक्ती टीव्ही पाहात असतील तर स्मार्टफोन वर व्हिडीओ पाहतात. अनेक जण सकाळची सुरुवात आध्यात्मिक व्हिडीओ पाहून करतात. भारताच्या 18 शहरांतील 4 हजार युजरनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. एरिक्सन भारतात ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत डॉट सोल्युशन्स लाँच करणार आहे.