मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

'स्लमडॉग..' ठरला सर्वश्रेष्ठ हॉलीवूड चित्रपट

स्लमडॉगच्या यशात मानाचा तुरा : सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार

IFM
झोपडीत राहणारा युवक करोडपती बनतो, या कथेवर आधारीत 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटास हॉलीवूडने सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार दिला आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणा-या या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळाले आहे. लॉस एंजलिसमध्ये झालेल्या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक डेनी बोएल यांना 'प्रोड्यूसर्स गिल्ड आफ अमेरिका' (पीजीए) च्यावतीने सर्वश्रेष्ठ हॉलीवूड चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

गोल्डन ग्लोब, ऑस्कर नामांकनानंतर पीजीएच्या पुरस्कारामुळे हा चित्रपट जगातील सर्वांधीक पुरस्कार मिळवणारा चित्रपट ठरला आहे.

जगभरातील प्रतिष्ठीत पुरस्कारांमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचत आहे. शुक्रवारी भारताबरोबरच अमेरीकेतील एक हजाराहून अधिक चित्रपटघगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे.