गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. ओळख खेळाडूंची
Written By
Last Updated : मंगळवार, 17 मार्च 2015 (13:19 IST)

बर्थडे स्पेशल: सायनाने वाढवले भारताचे मान

किमान एक दशकापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव स्थापित करणारी देशाची शीर्ष बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सध्या आपल्या  करियरच्या शिखरावर आहे आणि विश्वाची सर्वोच्च खेळाडू बनण्याच्या तयारीत आहे.  
 
सायनाचे जबरदस्त प्रदर्शनाला या प्रकारे समजू शकतो की तिने या वर्षी विश्व चॅम्पियन स्पेनच्या कैरोलीना मारिनच्या विरुद्ध एक किताबी सामना जिंकून आपल्या करियरचा पहिल्या वर्ल्ड सुपरसीरीज प्रीमियर टूर्नामेंट 'ऑल इंग्लंड ओपन'च्या फायनलपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पार करण्यात यश मिळवला. सायना पहिली भारतीय महिला खेळाडू बनली, पण यात सायनाला किताबी सामन्यात मारिनच्या हाती पराभव पत्करावा लागला.  
 
ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू सायनाने चिनी खेळाडूंच्या दबदबा ठेवणार्‍या या खेळात माजी सर्वोच्च विश्व वरीयता प्राप्त चीनची शिजियान वांगला नमवून विश्व रँकिंगमध्ये करियरच्या सर्वोच्च दुसरी रँकिंगला परत मिळवले. सायना लंडन ऑलिंपिक-2012मध्ये महिला एकलं वर्गातील कांस्य पदक विजेता राहिली. सायना आज 25 वर्षांची झाली असून या लहान वयात तिने यापेक्षा अधिक किताब आणि पदक मिळवले आहे.  
 
वर्ष 2010 सायनाच्या करियरचे सर्वात यशस्वी वर्ष ठरले. या वर्षात तिने सिंगापूर सुपरसीरीज, इंडोनेशिया सुपरसीरीज, हाँगकाँग सुपरसीरीज शिवाय इंडिया ग्रांप्री गोल्ड जिंकले आणि एशियन चँपियनशिपच्या महिला एकलं वर्गात कांस्य पदक मिळविले. याच वर्षी देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रमंडळ खेळांमध्ये सायनाने महिला एकल वर्गात स्वर्ण पदक मिळवून देशाचे नाव गर्वाने मोठे केले. 
 
राष्ट्रमंडळ खेळ-2010मध्ये सायनाने मिश्रित टीम स्पर्धेत देखील देशाला रजत पदक जिंकण्यात महत्त्वाचे योगदान दिले. वर्ष 2008मध्ये   विश्व बॅडमिंटन संघ (बीडब्ल्यूएफ)कडून वर्ल्ड मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयरचे अवॉर्ड जिंकल्यामुळे सायनाला 2010मध्ये तिच्या शानदार उपलब्धतेमुळे देशाचे सर्वोच्च खेळ सन्मान राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
 
सायनाला त्याच वर्षी देशाचे प्रतिष्ठित पद्म पुरस्कार 'पद्मश्री' देण्यात आले. 2009मध्ये तिला प्रतिष्ठित खेळ पुरस्कार अर्जुन अवॉर्ड देऊन  सन्मानित करण्यात आले आहे. बरेच कीर्तिमान रचणारी सायना आज देशाच्या युवा पिढीचा आदर्श बनून चुकली आहे आणि तिचे स्वप्न आता जगातील नंबर एक महिला बॅडमिंटन खेळाडू बनण्याचे आहे.  
 
आपल्या या लहानश्या करियरमध्ये सायनाने भारताला बरेच कीर्ती स्तंभांपर्यंत प्रथमच पोहोचण्याचे गौरव मिळवून दिले आहे आणि देशाला  देखील गौरवान्वित केले. सायना विश्व ज्युनियर चँपियनशिप जिंकणारी आणि सुपरसीरीजचे किताब जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे.  
 
सायनाच्या उंचीला आम्ही अशा प्रकारे समजू शकतो की तिला ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टचे समर्थन प्राप्त आहे आणि योनेक्स सारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड तिचे प्रायोजक आहे.