शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025 (18:59 IST)

पार्थ पवार यांच्या कंपनीवर बोपोडीतील सरकारी जमिनीच्या गैरव्यवहाराचा एक नवीन गुन्हा दाखल

parth pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया कंपनीवर पुण्यातील 40 एकर जमीन खरेदीत फसवणूक केल्याचा आरोप आहे.  पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 40 एकरचा भूखंड खरेदी केल्यानंतर कंपनीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव झाला.
कोरेगाव पार्क मधील गैरव्यवहार प्रकरणांनन्तर आता बोपोडीतील सरकारी जमिनीच्या गैरव्यवहाराचा एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह नऊ जणांविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
नायब तहसीलदार प्रविणा शशिकांत बोर्डे यांनी शासनाकडून प्राधिकृत अधिकारी म्हणून दिलेल्या तक्रारीत 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 कालावधीत तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर आदेश व पत्र तयार केल्याचा आरोप आहे. 
बोपोडी येथे 5 हेक्टर 35आर जमीन 1883 पासून कृषी विभागाच्या ताब्यात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ही जमीन शासनाच्या मालकीची असून त्यावर व्हिजन प्रॉपर्टी व इतर अर्जदारांशी संगनमत करून जमिनिवर खोटा मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जमिनीवर गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक करण्यात आली. असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

या नव्या व्यवहारामुळे पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्ज कंपनीशी संबंधित जमिनी व्यवहारांवर प्रश्न उपस्थित झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 
Edited By - Priya Dixit